राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा ( Ratan Tata) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “जी कामं अगदी शेवटी, घाईत मंजूर केली त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही,” असे सांगितले.