राज्यात सर्व विरोधी पक्ष हे आपला पक्ष वाचवण्यात गुंतले आहेत. पूर्वी विरोधी पक्षनेते असलेल्या एका नेत्याच्या बँकेवर ईडीचा छापा पडला यातूनच वाचण्यासाठी अजित दादा विरोधी पक्ष नेते पद सोडून दुसरे पद मागत आहेत का? दुसरीकडे पक्ष आणखी खड्ड्यांत जाऊ नये म्हणून काँग्रेसच्या नाना पटोलेंना केंद्रीय नेतृत्व समज देत आहेत. विरोधी नेत्यांची ही कसली वज्रमूठ आहे? त्यांच्यामध्ये स्टेजवरून कोणाची खुर्ची कुठे आणि कशी असावी आणि आधी भाषण कोणी करावे यावरून भांडणे होतात, या वादामुळेच त्यांनी जाहीर सभा बंद केल्या आहेत. विरोधकांच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. ज्यांना एकत्र राहता येत नाही ते मोदींना पराभूत करायला निघाले आहेत
देशांमध्ये नागरिक मोदींवर खुश आहेत.. विविध योजना राबवून संकट काळात नागरिकांना त्यांनी सावरले आहे.. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.. लोकांच्या या विश्वास आणि आशीर्वादावर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत असे सांगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राज्य चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय.