CBSE 12th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 12वीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर निकाल पाहू शकतात. याशिवाय results.gov.in वरही निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकालही आज लागणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93%, तर केंद्रीय विद्यालयाचा निकाल 97.04% लागला आहे. यंदाच्या निकालात त्रिवेंद्रमने सर्व झोनमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
मुलांपेक्षा मुलींचा निकाल 3.29% जास्त आहे.
33 हजार विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण मिळवले.
1.32 लाख विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
त्रिवेंद्रमचा निकाल सर्वोत्तम लागला. येथे 98.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रयागराजचा निकाल सर्वात वाईट लागला. येथे 83.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
टर्म 1 च्या परीक्षेला 30% वेटेज दिले जाते आणि टर्म 2 ला 70% वेटेज दिले जाते.
33 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त, 1.34 लाखांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
या ठिकाणी पाहा निकाल
असा पाहा निकाल
सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर दिसणार्या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
येथे तुमचा रोल नंबर, जन्म तारीख व इतर विचारलेली माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.