तमिळनाडू सरकारने सीबीआय यंत्रणेबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात परवानगीशिवाय प्रवेश करण्यास सीबीआयवर बंदी घातली आहे. सीबीआयला आता कोणत्याही प्रकरणात तपासासाठी तामिळनाडूत येण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.
या निर्णयामुळे सीबीआयला तमिळनाडूत थेट कोणतीही कारवाई करता येणार नाहीमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला आहे. सीबीआयकडून सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
ईडीने तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्या घरावर छापेमारी केली आणि लगेच तमिळनाडू सरकारने सीबीआयची राज्यात नाकाबंदी केली. त्यामुळे आता तमिळनाडू राज्यातील कोणत्याही गुन्ह्याबाबत तपास करण्याआधी सीबीआयला आता राज्य सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.