Cabinet Decision On MSP : शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दिशेने सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप पिकांसाठी MSP (किमान आधारभूत किंमत) मंजूर केली आहे. 2022-23 हंगामासाठी खरीप पिकांच्या एमएसपीला मान्यता देण्यात आली आहे. सध्या 2021-22 साठी धान्यांचा एमएसपी 1940 रुपये प्रति क्विंटल आहे. (cabinet decision give approval to msp for kharif crops)
यापूर्वी, रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे की, खरीप तसेच रब्बी हंगामातील खतांची गरज भागविण्यासाठी भारताकडे युरियाचा पुरेसा साठा आहे आणि डिसेंबरपर्यंत त्याची आयात करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झाल्या असून येत्या सहा महिन्यांत त्याच्या किमती आणखी खाली येतील, असे ते म्हणाले.
मांडविया यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, "देशात युरियाची पुरेशी उपलब्धता आहे. देशांतर्गत गरज भागवण्यासाठी आमच्याकडे डिसेंबरपर्यंत युरियाचा साठा आहे. आम्हाला डिसेंबरपर्यंत आयात करण्याची गरज नाही.” सरकारने आधीच 1.6 दशलक्ष टन युरिया आयात केला आहे, जो पुढील 45 दिवसांत पाठवला जाईल.
युरियाचा पुरेसा साठा
डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या बाबतीत, मांडविया म्हणाले की, डिसेंबरपर्यंत स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन तसेच दीर्घकालीन आयात व्यवस्था पुरेशी असेल. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने माफक दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अनुदानात वाढ केली आहे. खरीप (उन्हाळी पेरणी) हंगाम आधीच सुरू झाला आहे, तर रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबरमध्ये सुरू होते.
खत मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारांकडे सध्या 70 लाख टन युरियाचा साठा आहे, तर 1.6 दशलक्ष टन युरिया आयात केला जात असून डिसेंबरपर्यंत 175 लाख टन युरियाचे उत्पादन होईल. याशिवाय, अधिकाऱ्याने सांगितले की, बरौनी आणि सिंद्री येथील दोन नवीन प्लांटमधून सहा लाख टन युरिया उपलब्ध होईल, जे ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित केले जातील आणि आणखी दोन दशलक्ष टन पारंपरिक युरियाचा वापर द्रव नॅनो युरियाने बदलला जाईल.