ताज्या बातम्या

केरळ: RSS च्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला; कार्यालयाचं नुकसान

केरळमधील कन्नूर जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाला. हल्ल्यात इमारतीच्या खिडक्या फुटल्या आहेत.

Published by : Shweta Chavan-Zagade

केरळमधील कन्नूर जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाला. हल्ल्यात इमारतीच्या खिडक्या फुटल्या आहेत. पोलीस स्टेशन अगदी जवळ असूनही हा हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.

केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातल्या पय्यन्नूर मध्ये हे ऑफिस आहे. या ऑफिसच्या शेजारीच पोलीस स्टेशनही आहे. मंगळवारी म्हणजेच १२ जुलै २०२२ रोजी सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पय्यानुर पोलिसांनी दिली. या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्यालयातील फर्निचरचंही नुकसान झाल्याचं कार्यालयामधील फोटोंमध्ये दिसत आहे.

स्थानिक नेत्यांनी सांगितलं की, अशा प्रकारच्या घटना धोकादायक आहेत. पोलीस स्टेशन अगदी १०० मीटर अंतरावर असतानाही अशा घटना घडणं दुर्दैवी आहे. हे दुर्लक्ष नाही तर अपयश आहे. या सगळ्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे