ताज्या बातम्या

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गणपती दर्शनसाठी आज मुंबई, पुण्याच्या दौऱ्यावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई, पुण्यातील गणेश मंडळांच्या भेटीकरिता येत आहेत. यावेळी ते मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

Published by : shweta walge

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई, पुण्यातील गणेश मंडळांच्या भेटीकरिता येत आहेत. यावेळी ते मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचे दर्शन घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचेही ते दर्शन घेतील. यासोबतच भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील मंडळास ते भेट देणारेत. मुंबईतील दौऱ्यानंतर ते पुण्याला रवाना होतील. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होतील. त्यानंतर सायंकाळी पुण्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यावेळी एनएसएस स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

असा असेल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दौरा

सकाळी 10.45 वाजता लालबागचा राजाचे दर्शन

12.15 वाजता केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव मंडळाला भेट

दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती दर्शन

दुपारी 1.50 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

सायंकाळी 4.45 वाजता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

सायंकाळी 5.30 वाजता पुण्यात एनएसएस स्वयंसेवकांचा मेरी माटी मेरा देश कार्यक्रमास हजेरी

रात्री 9 वाजता दिल्लीला रवाना

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी