चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत नाना काटे 3604, अश्विनी जगताप यांना 4053 मते आणि राहुल कलाटे 1273 मते मिळाली.
त्यानंतर दुसऱ्या फेरीतही त्यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत जगताप यांना 4 हजार 471 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नाना कलाटे यांना 3 हजार 701 मते तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1 हजार 674 मते मिळाली. या फेरीत जगताप या 700 मतांनी आघाडीवर होत्या.
तिसऱ्या फेरीत जगताप यांना 7 हजार 882 मते मिळाली. नाना काटे यांना 7 हजार 206 मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या राहुल काटे यांना 2 हजार 645 मते मिळाली आहेत.