ताज्या बातम्या

अजित पवारांवरील 'त्या' वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारीं पुन्हा चर्चेत

अजित पवारांवरील वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारीं पुन्हा चर्चेत

Published by : shweta walge

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

भगतसिंह कोश्यारींनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,” असं कोश्यारी यांनी म्हटले आहेत.

“मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते खूप हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं,” असेही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

दरम्यान, शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत,” असं कौतुकही भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांचं केलं.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी