माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा झाल्याचे दिसत नाही. त्या वक्तव्यांमागे प्रथमदर्शनी समाज प्रबोधनाचा उद्देश दिसतो,’ असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नोंदवला.
यांच्यावर फौजदारी गुन्हा व अॅट्रॉसिटी कायद्याखालील गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. कोश्यारी व त्रिवेदी यांची वक्तव्यांचा सखोल विचार केला तर ते इतिहासापासून काय शिकायला हवे असे सांगून समाजप्रबोधन करण्याचा उद्देश अशा वक्तव्यांमागे प्रथमदर्शनी दिसत आहे. कोणत्याही महापुरुषाचा अनादर करण्याचा आणि अनुसूचित जाती व जमातीच्या सदस्यांसाठी अत्यंत आदरणीय असलेल्या व्यक्तींचा अनादर करण्याचा हेतू त्यामागे असल्याचे किंचितही दिसत नाही,’ असे खंडपीठाने आदेशात नमूद केले.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठानं या संदर्भातील याचिका फेटाळताना आपल्या आदेशात नमूद केलं आहे. त्यामुळे आता माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळून लावली आहे.