लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथे आयोजित जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारणासाठी मराठा समाजाला बदनाम करु नका. ही माझी जाहीर मागणी आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय नाही. मी जरांगे पाटील यांनासुद्धा सांगितले आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, हा विषय सामाजिक आहे, कायदेशीर विषय आहे. या विषयाला अशोक चव्हाण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे. आपल्या जिल्ह्याचा खेळखंडोबा करु नका. येळेगावला मतं कमी मिळणे म्हणजे अशोक चव्हाणची बदनामी करण्यासारखं आहे. तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का? मला राजकारणासाठी या विषयाचा फायदा उचलायचा नाही. आज ज्यावेळी वातावरण एकोप्याचे झालं आहे. मोदी साहेबांना मी सांगितले आहे की, आम्ही ही सीट काढू म्हणजे काढू. असे अशोक चव्हाण म्हणाले.