ताज्या बातम्या

Assembly by-election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त

Published by : Shweta Chavan-Zagade

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना (BJP- Shivsena) सामना रंगणार आहे. अशातच भाजपाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची (Andheri East Assembly by-election) धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदार संघ रिक्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या मतदार संघात पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून ही जबाबदारी आशिष शेलार (Ashish Selar) यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. (Andheri East by-election 2022)

पंढरपूर, कोल्हापूर या पोटनिवडणुकीनंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर या मतदार संघाची धुरा भाजपाने आशिष शेलार यांच्या खांद्यावर दिली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पू. मतदार संघ रिक्त झाला होता. येत्या काही दिवसांत या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाकडून आढावा घेण्यासाठी शेलारांची निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीत शिवसेना विरूद्ध भाजप अशी जोरदार लढत होणार आहे. याआधीही शेलार यांनी मुंबई महापालिकेसाठी उत्तम कामगिरी बजावली आहे. आता पुन्हा एकदा भाजपाने आशिष शेलार यांना मैदानात उतरवले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी