Ravi Choudhary
ताज्या बातम्या

"माफी मागणाऱ्या सावरकरांच्या नाही, आम्ही भगतसिंगांच्या औलादी, फाशीलाही घाबरत नाही"

मनिष सिसोदिया यांच्यावर सीबीआय कारवाईची शक्यता वर्तवताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Published by : Sudhir Kakde

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी केजरीवाल (CM Arvind Kejriwal) सरकारच्या अबकारी धोरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची शिफारस सीबीआयला केल्यानं आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या तपासापूर्वीच उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी असलेल्या उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच यावेळी केजरीवाल यांनी सिसोदियांना केंद्रीय यंत्रणांकडून अटक होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली आहे. सिसोदिया हे अत्यंत प्रामाणिक असून त्यांना तुरुंग किंवा फाशीची भीती वाटत नाही असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाले, "नायब राज्यपालांनी मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयकडे केस पाठवली आहे. सीबीआय लवकरच मनीष सिसोदिया यांना अटक करणार आहे. मी तुम्हाला 3-4 महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. सिसोदिया यांना अटक होणार असल्याचं त्यांच्या माणसांनी मला सांगितलं होतं. मी अनेक पत्रकार परिषदा आणि विधानसभेत देखील सांगितलं होतं. मी त्यांना विचारलं होतं की, काही केस आहे का? तर ते म्हणाले अजून काही सापडलं नाही, आम्ही शोधतोय, काहीतरी बनवतोय. आता आपल्या देशात एक नवीन व्यवस्था आली आहे. आधी कोणाला तुरुंगात पाठवायचं हे ठरवलं जातं आणि मग त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला जातो.

"तुम्ही सावरकरांची लेकरं, आम्ही भगतसिंगांच्या औलादी"

केजरीवाल म्हणाले, "पूर्ण प्रकरण खोटं आहे. यामध्ये अजिबात तथ्य नाही. मी मनीष सिसोदिया यांना 22 वर्षांपासून ओळखतो. 2000 मध्ये पहिल्यांदा भेटलो. ते अत्यंत प्रामाणिक आणि देशभक्त आहे. आम्ही तुरुंगाला घाबरत नाही. तुम्ही सावरकरांची मुलं आहात, ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. आम्ही भगतसिंगांची मुले आहोत. आम्ही भगतसिंग यांना आदर्श मानतो, भगतसिंगांनी इंग्रजांसमोर झुकण्यास नकार दिला आणि फासावर गेले होते. तुरुंगाला आणि फाशीला आम्ही घाबरत नाही." असं केजरीवाल म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये केलेल्या कामाचं देखील कौतुक केलं.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी