मुंबई : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेने (Shivsena) राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. आमदार रवी राणा आणि नवणीत राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, जोपर्यंत ते माफी मागणार नाही, त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार नाही तोपर्यंत शिवसैनिक हलणार नाही असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले.
राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून, जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही बाजुला हटणार नाही असं शिवसैनिकांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे त्यांच्या घरासमोर देखील तणाव निर्माण झाला आहे. तर मुंबई पोलीस देखील याठिकाणी दाखल झाले असून, राणा दाम्पत्याला घरातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून रणनिती आखण्याचं काम सुरु झालं आहे.
दरम्यान, उद्या मुंबईत पोलीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. पहिल्या लतामंगेशकर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असून, त्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. यामुळे कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांसमोरंही आव्हान आहे.