पुणे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती मिळवण्यासाठी हाके यांनी खोटी माहिती दिली. वकील अमोल गव्हाणे यांचे लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप आहेत. हाकेंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला हाके यांनी दिलेल्या बायोडाटामध्ये ते पीएचडी धारक तसेच प्राध्यापक असल्याची माहीती त्यांनी दिली.
मात्र, हाके यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवताना दिलेल्या शपथपत्रात त्यांची शैक्षणिक पात्रता एमए असल्याची माहिती आहे. ॲडव्होकेट अमोल गव्हाणे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून माहिती अधिकारात हाके यांचा बायोडाटा मिळवला. हाके यांनी पीएचडी आणि प्राध्यापक असल्याची खोटी माहिती देऊन मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती मिळवली आणि त्या आधारे आर्थिक लाभ मिळवले. त्यामुळे हाके यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ॲडव्होकेट अमोल गव्हाणे यांनी अशी मागणी करतं, या मागणीसाठी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे.