Amit Shah 
ताज्या बातम्या

नवनीत राणांच्या सभेत पाऊस पडला, पण अमित शहांनी विरोधकांना धरलं धारेवर, म्हणाले, "उद्धव ठाकरे..."

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर तोफ डागली. ते अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Published by : Naresh Shende

तुमचं एक एक मत नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवणार आहे. तुमचं एक एक मत दहशतवाद, नक्षलवादापासून या देशाची सुटका करण्यासाठी जाणार आहे. तुमचं एक एक मत रामराज्याच्या पक्षात जात आहे. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी विकासाची गंगा वाहिली आहे. काँग्रेसने ७० वर्ष प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधल नाही. पण मोदींनी पाच वर्षातच खटलाही जिंकला आणि प्राणप्रतिष्ठापणा करुन प्रभू श्री रामाचं मंदिर उभारलं. स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष समजणारे उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं होता. पण नकली शिवसेनेचे हे नेते सोनिया गांधींच्या भीतीमुळे प्राणप्रतिष्ठेला गेले नाहीत. शरद पवारांनाही निमंत्रण दिलं होतं. त्यांनी म्हटलं तब्येत ठीक नाही. मग आता निवडणुकीत कसे फिरत आहेत, राहुल गांधींनाही निमंत्रण दिलं होतं. आधी त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घ्यावं, त्यानंतर अमरावतीची जनता त्यांचं ऐकेल, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

अमित शहा जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, औरंगेजबने तोडलेला काशी विश्वनाथ कॉरिडोर मोदींनी बनवला. केदारधाम आणि बद्रीधामचं जीर्णोद्धार केलं. सोमनाथचं मंदिरही पुन्हा सोन्याचं बनत आहे.मल्लिकार्जून खर्गे म्हणतात, महाराष्ट्राचा काश्मीरशी काय संबंध आहे, खर्गेंना मला सांगायचंय, महाराष्ट्राचा बच्चा बच्चा काश्मीरसाठी आपलं प्राण देऊ शकतो. राहुल गांधी म्हणाले होते, कलम ३७० हटवल्यावर रक्ताची नदी वाहेल. रक्ताची नदी सोडा, पाच वर्ष झाले कुणाची दगड उचलायची हिंमत झाली नाही.

मोदींनी कलम ३७० हटवून या देशातील दहशतवाद संपवला आहे आणि काश्मीरला भारताचच बनवलं. मी नवनीत राणांना सपोर्ट केला होता, म्हणून मी अमरावतीच्या नागरिकांची माफी मागतो, असं शरद पवार म्हणाले होते. मी पवारांना सांगू इच्छितो, पवार साहेब इतके वर्ष देशाचे कृषीमंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री होते, माझ्या विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

तुम्ही विदर्भाच्या विकासासाठी काहीच केलं नाही. माफी मागायची असेल, तर विदर्भातल्या शेतकऱ्यांची माफी मागा. भाजपने ४०० जागा जिंकल्या, तर आरक्षण रद्द होईल, असे काँग्रेस पक्षाचे नेते सांगतात. पण आज स्पष्ट करतो, भाजप आरक्षण रद्द करणार नाही आणि हटवणारही नाही. ही नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे. काँग्रसवाले खोटे बोलतात. आम्ही बहुमताचा उपयोग ३७० कलम हटवण्यासाठी केला, त्रिपल तलाक हटवण्यासाठी केला. देशात सीएए कायदा लागू करण्यासाठी केला. काँग्रेस पक्ष म्हणतोय, आमचं सरकार आल्यावर त्रिपल तलाक पुन्हा घेऊन येणार. या देशात त्रिपल तलाक पुन्हा कधीच येणार नाही, हे भाजपचं मुस्लिम महिलांना वचन आहे, असंही अमित शहा म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी