अजित पवार यांनी भाजपच्या दबावाला न जुमानता नवाब मलिक यांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतर अजित पवार नवाब मलिक यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, अजित पवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी आज अणुशक्तीनगर येथे दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली.
सना मलिक आणि नबाव मलिक यांच्यासाठी अजित पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. आरोप करणं वेगळं आणि ते सिद्ध होणं वेगळं असं म्हणत अजित पवारांनी मलिकांसोबतच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. दादांच्या या भूमिकेमुळे महायुतीत बिघाडीची होण्याची शक्यताय. एवढंच नव्हे तर मलिकच जिंकतील असंही दादांनी म्हटलंय. यामुळे महायुतीचे उमेदवार सुरेश पाटील की नवाब मलिक? अस सवाल उपस्थित झालाय.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी नवाब मलिक यांना देऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड दबाव आणला होता. मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू नये, आमचा त्यांना विरोध असेल, अशी भूमिका भाजपने जाहीर केलेली होती.