मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा (Corona Virus) आलेख वाढत आहेत. अशात पुन्हा मास्क सक्ती करण्याचे संकेत राज्य सरकारकडून वारंवार दिले जात आहे. परंतु, मास्क सक्तीबाबत (Mask) सरकार आणि प्रशासनात गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राज्याचे आरोग्य सचिव म्हणतात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना पाठवले आहे. तर, दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्ती नाही तर ऐच्छिक असल्याचे सांगितले आहे. यामुळे राज्य सरकारमधील गोंधळात-गोंधळ समोर आला आहे. यावर आज अजित पवार म्हणाले की, आम्ही मास्क सक्ती केली नाही. पण, सचिवांना सांगितलं आहे की जिथे गर्दी असेल तिथे मास्क सक्तीचे करावे. मास्क वापरण्याची आम्ही सक्ती करत नाही आहोत. पण आवाहन करत आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पर्यावरण दिनानिमित्त आज अजित पवार एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सगळयांना शुभेच्छा देतो. एखाद चांगलं काम केल्यावर समाजाने, राज्याने पाठीवरून हाथ फिरवला तर नवीन ऊर्जा मिळते. शेवटच्या माणसाच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण होत नाही तर त्या कार्याचा उपयोग नसतो, असे त्यांनी सांगितले.
मी स्पष्ट बोलतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. माझं स्पष्ट सांगणं आहे की आता पासून मार्क्स ठेवा. ज्या शहराला जास्त मार्क्स असतील त्यांना बक्षीस दिला जाणार, अशीही माहिती त्यांनी सांगितली.