काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या निषेधार्थ अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात हल्ला बोल केला आहे. काश्मीर खोऱ्यात नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगच्या विरोधात 'आप'ने रविवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. (aap holds jan aakrosh rally 1990s era returned in kashmir again arvind kejriwal attacks centre for target killings of kashmiri pandits)
यावेळी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, आज काश्मीरमध्ये 1990 चे युग परत आले आहे. काश्मीरमध्ये पुन्हा काश्मिरी पंडितांची निवडक हत्या केली जात आहे. त्यांना संरक्षण देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. काश्मीरमध्ये जे घडत आहे त्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आणि चिंता आहे.
आज पुन्हा काश्मिरी पंडितांना त्यांची जन्मभूमी सोडावी लागली आहे. त्याच वेळी काश्मिरी पंडित टार्गेट किलिंगला विरोध करतात, तेव्हा काश्मीरमधील सध्याचे भाजप सरकार त्यांना आंदोलन करू देत नाही. सरकार असे वागले तर जनतेने कुठे जायचे असा सवाल देखील यावेळी केजरीवाल यांनी केला आहे.