Aaditya Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

Aaditya Thackeray Nistha Yatra : शिवसेना पुनर्बांधनीस वेग; आदित्य ठाकरे काढणार 'निष्ठा यात्रा'

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच कामाल लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच कामाल लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरवात आज 8 जूनपासून होणार आहे.

यात्रेदरम्यान, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिवसेना (shivsena) बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही शिवसेना शाखांना भेट देणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देणे हाच या यात्रेपाठीमागे हेतू असणार आहे. असे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांविरुद्ध आक्रमकपणा कायम ठेवला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'गद्दार हे गद्दारच असतात. पण जे सोडून गेले आहेत आणि त्यांना परत यायचे असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत.'

निष्ठा यात्रा कार्यक्रम कसा असेल?

8 जूनपासून यात्रेस सुरुवात

शिवसेनेच्या तब्बल 236 शाखांना प्रत्यक्ष भेट

शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातहीकरणार यात्रा

शाखेतील गटप्रमुख, शाखाप्रमुख,शिवसैनिक यांच्याशी थेट भेट

निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी