एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले होते.त्यानंतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. त्या मुलीला पैशांची गरज आहे, असा मेसेज केला. त्यासाठी क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला.
या प्रकाराची माहिती मिळताच सायबर पोलिसांशी संपर्क साधून खातं बंद केले. ट्विटरला रिपोर्ट देखिल केलं. रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला हे बनावट खाते बंद झाले.