India

JioPhone Next | जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनची मुकेश अंबानींनी केली घोषणा

Published by : Lokshahi News

देशात नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. जियो फोन नेक्स्ट असे या फोनचे नाव असून या वर्षी १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केला जाईल, असं मुकेश अंबानी यांनी जाहीर केले.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेनिमित्त त्यांनी ही घोषणा केली. जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे."भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यानी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे", असं मुकेश अंबानी यांनी सांगितले.

फीचर्स

  • जिओ आणि गुगलने संयुक्तपणे हा फोन तयार केला आहे.
  • फीचर स्मार्टफोन असणार.
  • फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचं ऑप्टिमाईज्ड व्हर्जन
  • अँड्रॉइड, गुगल आणि जिओचे सर्व मोबाईल अॅप्लिकेशन्स मिळणार
  • व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे