Mumbai

“मोदीजी माफी मांगो” काँग्रेसचे राज्यभरात भाजपा कार्यालयासमोर आंदोलन

Published by : Lokshahi News

देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपा पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले असून मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मोदीजी माफी मांगो अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे,

मुंबईत मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यापासून काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदीजी माफी मांगो, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी