महाराष्ट्र

'इथे क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेन लक्षात ठेवा'

Yashomati Thakur यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : इथे क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेन लक्षात ठेवा, असा सज्जड दम माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबतचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमरावतीच्या तिवसा तालुक्यात रत्याचे भूमिपूजन आज यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, ठाकूर यांचे कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी उपस्थित हाेते. त्यांनी मी तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही. इथं क्वालिटीचं काम दिसले पाहिजे. इथे क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकंच फोडेन लक्षात ठेवा, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. छोट्या-छोट्या वाडी वस्त्या जोडल्या गेल्या, तर स्थानिक जनतेला रहदारी करण्याची सुविधा निर्माण होते, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. याआधी भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण गावातील अंतर्गत रस्ते जोडण्यासाठी ६ लक्ष निधीतून काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. तर, टाकरखेडा शंभु येथे टाकरखेडा-जळका-दर्याबाद-पुसदा-सालोरा, रस्ता प्र.जि.मा - ६९ वरील या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, काकडा, रासेगाव, पुर्णानगर, साऊर, शिराळा, मोझरी रस्ता राज्य मार्ग क्रमांक ३०८च्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ शिराळा फाटा येथे केला.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव; भाजपचे राजेश वानखडे यांचा विजय

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी