महाराष्ट्र

व्हॉट्सअ‍ॅपवर न्यूड व्हिडिओ कॉलच्या घटनांमध्ये वाढ: जाणून घ्या, कशी खबरदारी घ्यावी

जाणून घ्या, असे कॉल आल्यास काय करावे?

Published by : Team Lokshahi

गुडगाव :

व्हॉट्सअ‍ॅपवरवर न्यूड व्हिडिओ कॉल करण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. न्यूड व्हिडिओ कॉलच्या जाळ्यात अडकवून सोशल मीडियावर हे व्हिडिओ टाकून बदनामीची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. फसवणुकीची ही रक्कम हजारो किंवा लाखोंमध्ये जाते. मंगळवारी दोन व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. त्यानंतर ही तक्रार ई-मेलद्वारे पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका महिलेला अनोळखी व्हॉट्सअ‍ॅपवरवरील नंबरवरून वारंवार व्हिडिओ कॉल येत होते. त्या महिलेने एकदा कॉल उचलला तर त्यात अश्‍लिल हावभाव व संभाषण सुरु झाले. यामुळे तिने तो कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर अश्लिल मेसेज येऊ लागले. यामुळे तो नंबर त्या महिलेने ब्लॉक केला.

दुसऱ्या प्रकरणात एका युवकाला अनोळखी नंबरवरून अश्लिल व्हिडिओ कॉल आला. तो कॉल उचलून काही वेळा संभाषण झाले. त्यानंतर काही तासांनी त्या व्हिडिओ कॉलमधील फोटो मिक्स करुन व्हॉट्सअ‍ॅपवरवर टाकले. त्यात पैशांची मागणी करत दिलेल्या नंबरवर पैसे न पाठवल्यास तुमच्या फेसबुकवर व नातेवाईंकांमध्ये हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या व्यक्तीने मागितलेले दहा हजार दिल्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी करणारे फोन येऊ लागले. दुसऱ्यांदाही त्याने पैसे भरले. परत प्रकार थांबत नसल्यामुळे शेवटी या प्रकरणाची तक्रार सायबर सेलकडे दिली.

काय आहे प्रकार

या प्रकारासंदर्भात सायबर क्राईम पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, रोजी पाच-सात तक्रारी या पद्धतीच्या फसवणुकीच्या येत असतात. त्यानंतर जो नंबर दिलेला असतो ते बंद करुन फेकून दिला जातो. त्याचे लोकेशनही सायबर फ्रॉड करणारे सतत बदलत असतात. ब्लॅकमेलिंगसाठी तरुण पुरुष महिलांना कॉल करतात, तर तरुण मुली युवकांना कॉल करतात. पुरुषांच्या बाबतीत, व्हिडिओ कॉल केल्यावर मुलगी स्वतः न्यूड होते आणि समोरच्या व्यक्तीला न्यूड होण्यास सांगते. स्क्रीन रेकॉर्डरवरून या अश्लिलतेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याच्या नावाखाली हे आरोपी त्या तरुणींना व तरुणांना ब्लॅकमेल करतात. महिलांच्या बाबतीत व्हिडीओ कॉल करणारा तरुण स्वत: न्यूड राहतो. परंतु, महिलेने 5 सेकंदही व्हिडिओ ऑन ठेवला तर तो समोरचा व्यक्ती त्या महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून, एडिट करून ब्लॅकमेल करतो.

लोकेशन मिळणेही कठीण

सायबर क्राइम पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर बिजेंद्र सिंह यांनी सांगितले की, असे प्रकरण सातत्याने आपल्या समोर येत आहेत. पैसे उकळण्यासाठी व्हिडिओ कॉल केले जातात. अश्लील व्हिडीओ एडिट करून वायरल करायच्या धमकी दिल्या जातात. हे नंबर दुसऱ्यांच्या आयडीवरून येतात. लोकांनी अशा प्रकरणांपासून सतर्क राहण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपी राजस्थानमधील भरतपूर आणि यूपीमधील मथुरा परिसरात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

असे कॉल आल्यास काय करावे

  • १. अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडिओ कॉलकडे दुर्लक्ष करा.

  • २. व्हिडिओ कॉल घेताना तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा फ्रंट कॅमेरा तुमच्या

  • हातांनी झाकून घ्या

  • ३. व्हिडिओ कॉलवरील व्यक्ती ओळखीची असल्याची पुष्टी झाल्यावरच समोरच्या कॅमेऱ्यातून हात काढा.

  • ४. मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस ठेवा. यामुळे कोणीही सिस्टम हॅक करू शकणार नाही

  • ५. जर तुम्हाला चुकून व्हिडिओ कॉल आला आणि कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू

    लागला तर घाबरण्याऐवजी पोलिसात तक्रार करा.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी