एपीएमसीमध्ये भाजीपाला आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. पावसामुळे उठाव कमी झाला आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर 40 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात भाजीपाला आवकीत वाढ झाल्याने दर घसरले आहेत.
गेल्या आठवड्यात भाजीपाला दर वाढू लागल्याने राज्यातील, त्यासोबतच परराज्यातील शेतकरी वर्गाने भाजीपाल्याला दर मिळेल, या आशेपोटी मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाशी एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला आहे..यामुळे अवकीत अचानक वाढ झाली आहे. . तर दुसरीकडे गेल्या तीन-चार दिवसापासून पाऊस सुरु असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी भाजी खरेदीकडे पाठ फिरवल्याने उठाव कमी झाला आहे.
Vegetables retails rates (11/11/2021)
कांदा – 1 किलो – भाव (retail) 35 रुपये
बटाटा – 1 किलो – भाव – (retail) 20 रुपये
लसूण – 1 किलो – भाव – (retail) 60 रुपये
टमाटर – 1 किलो – भाव – (retail) – 35 रुपये
कोथिंबीर – 1 जुडी – भाव – (retail) – 15 रुपये
कडीपत्ता – 1 किलो- (retail) 40 रुपये
साधी मिरची – 1 किलो (retail) 30 रुपये
वाटाणा – 1 किलो – (retail) 160 रुपये
वांगी – 1 किलो – (retail) – 30 रुपये
घेवडा – 1 कोलो – (retail) – 50 रुपये
गवार – 1 कोलो – (retail) 40 रुपये
फ्लॉवर – 1 कोलो – (retail) – 40 रुपये
आळा – 1 किलो (retail) 25 रुपये किलो
शिमला मीरची – 1 किलो (retail) 50 रुपये
कारली – 1 किलो (retail) 20 रुपये
भेंडी – 1 किलो (retail) 40 रुपये