मुंबईत (Mumbai) आज (11 मे) पहटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन गर्मीपासून दिलासा मिळाला. मात्र या पावसाचा (Monsoon) तडाखा रेल्वेला बसला. मध्य रेल्वेच्या (Central Railway) अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तर हार्बर मार्गावरही (harbour railway) गाड्याही उशिराने धावत होत्या. तर ट्रान्स हार्बरवरील (trans harbour railway ) ठाणे ते वाशी सेवा पूर्णत: ठप्प होती. तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले.
मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली होती. आज सकाळी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसाचा तडाखा रेल्वेला बसला. मध्ये रेल्वेच्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी सेवा पूर्णत: ठप्प होती. तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले. परिणमी प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहेत.