मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- आम्ही सूर्य उगवल्यानंतर शपथ घेतली, अंधारात नाही- मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला.
- तुम्ही वचन मोडलंत आणि आम्हाला गुलामासारखं वागवल- मुख्यमंत्री ठाकरे.
- हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता हवी म्हणून मेहबुबा, संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती केली- मुख्यमत्र्यांची टीका.
- वापरायचं आणि टाकून द्यायचं ही भाजपचा स्वभाव- मुख्यमंत्री ठाकरे.
- आव्हान द्यायचं आणि मागे ईडीची पिडा लावायची हे शौर्य नाही- मुख्यमंत्री ठाकरे.
- हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही- मुख्यमंत्री ठाकरे.
- काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी मित्र होते. आपण त्यांना पोसलं. 25 वर्षे आपली युतीत सडली. या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असे बाळासाहेब म्हणाले. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. ते राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली- मुख्यमंत्री ठाकरे.
- दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करू- मुख्यमंत्री ठाकरे.
- जर एक व्हायरस आपल्या लाटा आणत असेल, तर शिवसेनेची लाट आपण का आणू शकत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.