महाराष्ट्र

Uday Samant's Car Attacked : शिवसैनिकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुणे शिवसेना शहर प्रमुखांनी ट्विट करुन शिंदे सरकारवर केली टीका

Published by : Team Lokshahi

अमोल धर्माधिकारी | पुणे : बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी (Shivsainik) हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्रभर अनेक शिवसैनिकांची धरपकड केली आहे. तर, पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी ट्विट करत या कारवाईचा निषेध केला आहे.

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई करत अनेक शिवसैनिकांची रात्रभर धरपकड केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकासह अनेक शिवसैनिकांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या हल्ला प्रकरणी पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर कलम 307 म्हणजेच जीवे मारण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी ट्विट करत या कारवाईचा निषेध केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली, असा आरोप संजय मोरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत कात्रज चौकात आले असता आदित्य ठाकरेंचा ताफाही त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांनी प्रचंड मोठी गर्दी चौकात केली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गद्दार गद्दार अशा घोषणा देत गाडीला घेराव घातला. पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला. यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे.

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी