पालघर जिल्ह्यात हाणू घोलवड तलासरी धुंदलवाडी बोर्डी या भागात आज दुपारी 12. 52 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या परिसरात तीन रीस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्का जाणवला. या धक्क्यांमुळे भूकंपग्रस्त भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच असून हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
आज दुपारी १२.५३ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने घोलवड , उंबरगाव , झाई , कोसबाड , चिखला, नरपड , आशागड , आंबेसरी , धुंदलवाडी हा परिसर भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ३ इतकी नोंद करण्यात आली आहे.