Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत मोठा कांड होणार असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लॅंडलाईनवर हा फोन आला आहे. मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान हा फोन आल्याचे समजते.
समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरकडून दावा करण्यात आला. एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने सांगितले. मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांना देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.