महाराष्ट्र

ह्रदयद्रावक घटना! नवरा लक्ष देत नसल्याने दोन मुलींसोबत आईने उचलले टोकाचे पाऊल

आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका आईने कोकण रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना माणगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे घडली या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भारत गोरेगावकर | रायगड : मुलींचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन जगताना झालेले कर्ज त्यातच नवरा लक्ष देत नाही की कसलीही मदत करत नाही यामुळे जगणे असह्य झाल्याने एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका आईने कोकण रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना माणगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे घडली या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.

गोरेगाव येथील गावडे कॉम्पलेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रिना जयमोहन नायर या महिलेने आपली 14 वर्षांची मुलगी जिया आणि 11 वर्षांची मुलगी लक्ष्मी या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन कोकण रेल्वे एक्स्प्रेस या गाडी खाली आत्महत्या केली. मोटारमनने या अपघाताची माहिती माणगाव रेल्वे स्थानकात दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गोरेगाव पोलिसांनी तातडीने रेल्वे ट्रॅक गाठले. मात्र, दोनच मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला. पोलीसांसह स्थानिक ग्रामस्थांनी कसून शोध घेतला असता दुपारी जिया हिचा मृतदेह ट्रॅक नजीकच्या झुडपात आढळून आला.

गोरेगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर दोन महिलांना अपघात झाला इतकाच मेसेज पोलीस यंत्रणेला मिळाला होता. मात्र, या अपघाताची चर्चा होताच पहाटे रिना यांची मैत्रीण स्वतःहून गोरेगाव पोलीस ठाण्यात आली व तिने आपल्याला व्हॉईस मेसेज पाठवल्याची माहिती पोलिसांना दिली. वहिनी मला माफ करा मी तुम्हाला बोलले, परंतु माझ्याकडून नाही होतं. मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन जातेय जीव द्यायला मोहनमुळे. त्याला इकडे बोलवून माझे जे देणे आहे ते द्यायला सांगा आणि रूम सोडून जायला सांगा, असे रिनाच्या व्हॉईस मेसेजमध्ये होते. यानंतर या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी