काही दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सरकार त्यांच्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींच्या आरोपांवर उत्तर दिले आहे.
दरम्यान, येत्या दोन-तीन महिन्यांत उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले होते हे लोक माझ्या मुलांचा इन्स्टाग्राम आयडीही हॅक करत आहेत असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. त्याचवेळी त्यांच्या या वक्तव्याची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.उत्तर प्रदेशमध्ये एका रॅलीदरम्यान प्रियांका गांधी वाड्रा यांनी सरकारवर आरोप केला होता की ते आता काही काम करत नाहीत. ते माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करत आहेत. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाच्या चौकशीची चर्चा केली .