अमोल धर्माधिकारी | राज्यात आदर्श शाळा म्हणून नाव कमावलेल्या वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने दत्तात्रय वारे यांची निलंबनाची कारवाई मागे घेण्याची याचिका फेटाळली आहे.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. दोन गळक्या खोल्या, पडक्या भिंती अशी या गावची सात वर्षापूर्वीची शाळा होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला होता. वाबळेवाडीच्या ज्या शाळेची आणि त्यासाठी दत्तात्रय वारे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.
मात्र दत्तात्रय वारे यांच्यावर 22 नोव्हेंबरला निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं कामात आर्थिक अनियमितता ठेवल्याचा ठपका ठेवत निलंबित केले होते. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेत निलंबन मागे घेण्याची याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिक्षक दत्तात्रय वारे यांना न्यायालयाचा दणका दिला. निलंबित कारवाईत हस्तक्षेप करु शकत नाही असे म्हणत फटकारले. तसेचे चौकशी समिती समोर हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत.