महाराष्ट्र

Shivsena vs Shivsena : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

कोणाच्या बाजुने लागणार निकाल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष

Published by : Team Lokshahi

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. आज हे प्रकरण विस्तारित पीठाकडे किंवा घटनापीठाकडे जाणार का, निवडणूक आयोगाच्या (Election Commision) नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार का, या दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सुनावणीत मिळणार आहेत.

बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ आज या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. 27 जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय करणार आहे.

तर, शिवसेना विरुद्ध शिवसेना वादावरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मूळ शिवसेना कोणाची, या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांना पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याबाबत शिवसेनेच्या मागणीवर न्यायालय अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी