राज्यसभेचे 10 खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुनेत्रा पवार दुपारी दीड वाजता उमेदवारी भरणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.