मराठा आरक्षणासाठी येत्या 26 जुलै पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून येणार असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन घेणे आवश्यक आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन पंतप्रधानांची भेट घेणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी मेटे यांनी यावेळी केली.
छत्रपती घराण्याचा अपमान
राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तयार केलेली सुकाणू समिती ही शिवप्रेमींच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केली आहे. या समितीमध्ये कोणीही इतिहास तज्ज्ञ, दुर्गप्रेमी यांचा समावेश नाही. केवळ निमंत्रित सदस्य म्हणून छत्रपती संभाजी राजे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे, असा आरोप मेटे यांनी राज्य सरकारवर केला .