राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व महापालिका एक सदस्यीय प्रभागाचा कच्चा आराखडा करण्यात गुंतले असताना महाविकास आघाडीने पुन्हा दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते. साखर कारखानदारीबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत.