Anil parab  
महाराष्ट्र

कारवाया मागे घेण्यासाठी 5 महिने एसटी बंद ठेवली; अनिल परबांचा सतप्त सवाल

मृत कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे 50 लाख दिले असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली

Published by : left

एसटी संपावर (ST Strike) गुरूवारी झालेल्या सुनावणीत कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई नको, एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) 22 एप्रिलपर्यंत रुजू व्हावे, अशी सूचना हायकोर्टाने केली. या निकालानंतर आझाद मैदानात वकिल गुणरत्न सदावर्तेंच्या उपस्थित धुळवड साजरी झाली.मात्र ही धुळवड नव्हती तर ही धुळफेक असल्याचे अनिल परब (Anil Parab) यांनी म्हणत निव्वळ कारवाया मागे घेण्यासाठी 5 महिने एसटी बंद ठेवली असा संतप्त सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानाबाहेर काल काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने व चप्पला फेकल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर रात्री आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी माध्यमांशी बोलताना आंदोनलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला. “कुणाच्या तरी भडकवण्यावरून जर कोणी कायदा हातात घेत असेल तर राज्य शासन हातावर हात ठेवून बसणार नाही. असं ते म्हणाले आहेत.”

धुळवड नव्हती, 100 टक्के धुळफेक होती, कारण ज्या कारणास्तव हा संप झाला, ज्या कारणास्तव 5 महिने एसटी बंद केलेली, महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरले गेले, आणि ते कारण हाताला लागले नाही, फक्त ज्या कारवाया केल्या गेल्या होत्या, त्या मागे घेण्यात आल्या, मग या कारवाया मागे घेण्यासाठी 5 महिने एसटी बंद केली होती का ? म्हणजे स्वतचं आलेलं अपयश लपवण्यासाठी, ही धुळवड साजरी केली गेली, ही धुळफेक म्हणायचं असे अनिल परब (Anil Parab) म्हणाले.

मृत कर्मचाऱ्यांना 50 लाख दिले

एसटी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी ही आम्ही देतच आहोत, फक्त कोर्टाने सांगितले वेळेवर द्या असे परब यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात जे मृत पावले आहेत, त्यांना शासकीय नियमाप्रमाणे 50 लाख दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी