Konkan Railway team lokshahi
महाराष्ट्र

कोकण रेल्वेच्या ताफ्यात स्पर्ट कार दाखल, असा होणार याचा फायदा

स्पर्ट कार पहिल्या आठवड्यापासून कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू

Published by : Shubham Tate

Konkan Railway : कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालून रेल्वे ट्रॅक चेक करणारी स्पर्ट कार दाखल झाली आहे. रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पर्ट कार रेल्वे रुळावरून चालते. ऑस्ट्रेलियात बनलेली ही कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झाली आहे. रेल्वेच्या रुळातील फौल्ट चेक करण्यासाठी कोकण रेल्वेत (Konkan Railway) या कारचा उपयोग केला जाणार आहे. (Spart car enters Konkan Railway convoy)

सध्या ही कार कोकणातील कणकवलीत आली असून रोहा पासून कणकवली पर्यंतचा रेल्वे ट्रॅक या कारद्वारे चेक केला जात आहे. ही कार दररोज 40 ते 50 किमीचा रेल्वे ट्रॅक चेक करते. त्यामुळे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती लवकर करणे शक्य झाले आहे. या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार रेल्वे ट्रॅक बरोबरच रस्त्यावरही चालते. भारतीय रेल्वेच्या ताफ्यात या कारचे पूर्वीच आगमन झाले होते. मात्र, कोकण रेल्वेच्या सेवेत ही कार एप्रिल पासून दाखल झाली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी