NCRB Team Lokshahi
महाराष्ट्र

NCRBचा धक्कादायक अहवाल; देशात तासाला होतात तीन बलात्कार

देशातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

Published by : Sagar Pradhan

देशात गुन्हेगारीचे प्रमाण काही काळापासून वाढतच चालले आहे. अशातच महिला अत्याचारावर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. 2021 मध्ये देशभरात महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये 4.28 लाखपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. देशात प्रत्येक तासाला सरासरी तीन महिलांवर बलात्कार होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारची संस्था असलेल्या NCRB ने 2021 चा गुन्हे नोंदणीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

97 टक्के आरोपी पिडीतेच्या जवळचे लोक

2021 मध्ये बलात्काराचे 31 हजार 677 गुन्हे दाखल झाले असून बलात्काराच्या प्रयत्नाचे 3 हजार 800 गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमध्ये 97 टक्के आरोपी पिडीतेच्या जवळचे असलेले समोर आले आहे. पुढे धक्कादायक म्हणजे 2 हजार 24 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करतात. असे या अहवालात समोर आले आहे.

काय आहे आकडेवारी?

60.96 लाख गुन्ह्यांपैकी 36.63 लाख गुन्हे हे भारतीय दंड संहिता(IPC) अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. 2021 मध्ये 2020 च्या तुलनेत 8 टक्के कमी गुन्ह्यांची नोंद आहे. 2020 मध्ये 66 लाखांहून जास्त गुन्ह्यांची नोंद झाली. 2021 मध्ये 29 हजार 272 हत्येचे गुन्हे दाखल झाले असून यानुसार दरदिवशी 80 हत्या होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आला आहे. अंतर्गत वादामुळे बहुतांशी हत्या झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रात असुरक्षित

2021 मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांविरोधातील 6,190 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर या यादीत मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे. 2021 मध्ये मध्य प्रदेशमध्ये 5273 गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. तेलंगणामध्ये 2021 मध्ये 1952 प्रकरणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये 2021 मध्ये 1841 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या अहवालामुळे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रात असुरक्षित असल्याचे निष्पन्न होत आहे.

देशातील सर्वाधिक आत्महत्या राज्यात

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यात तामिळनाडू आणि मध्य प्रदेश तिस-या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये देशभरात 1 लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यातल्या 22 हजार 207 आत्महत्या या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी