महाराष्ट्र

“CBI, NCB अधिकारी बाहेरून येऊन महाराष्ट्रातील मराठी लोकांना त्रास देतायत”

Published by : Lokshahi News

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून वेगवेगळे आरोप देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे एनसीबीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरवर आपले मत मांडले. यावेळी बोलताना त्यांनी, क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. पण एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं महाराष्ट्रातील मराठी लोकांना त्रास देत आहेत, असाही गंभीर आरोप केला.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी 'एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का?' असा सवाल केला आहे.

'क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही,' असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी