केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला आज भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर जन आशीर्वाद यात्रेत त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली. दरम्यान आता या भेटीच्या काही तासानंतरच शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण केले आहे. त्यामुळे नवा राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. तत्पुर्वी त्यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते त्यावेळी हजर होते.