शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या उदय सामंत यांची वकिलांकडून उलटतपासणी होत आहे. ही सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होत आहे. यावेळी आता उदय सामंत यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे.
उदय सामंत यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी मी मंत्री पदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो. भविष्यात तशीच कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधी नंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. म्हणून मी मंत्री मंडळात सामील झालो.
देवदत्त कामत
आपण शिवसेना कधी जॉईन केली?
उदय सामंत
मी 2014 मध्ये शिवसेना पक्ष जॉईन केला
देवदत्त कामत -
शिवसेना पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपण कोणत्या पक्षात होता
उदय सामंत
शिसवसेनेत येण्याआधी मी राष्ट्रवादी पक्षात होतो.
देवदत्त कामत
आपण किती वेळा महाराष्ट्रमध्ये आमदार राहिला आणि कोणत्या पक्षातून
उदय सामंत - मी चार वेळा महाराष्ट्र विधान सभेचा सदस्य राहिलो आहे.दोन वेळा राष्ट्रवादी आणि दोन वेळा शिवसेनेचा
देवदत्त कामत
2014 मध्ये आपण भाजप विरोधात आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवली आहे का?
उदय सामंत
हे सत्य आहे कारण त्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढत होते. त्यामध्ये शिवसेना, भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले होतो
कामत -
तुमच्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद क्रमांक २मध्ये दिलेल्या माहितीनुसार शिवसेना व भाजप हे १९९९ ते २०१९पर्यंत या दोघांमध्ये नैसर्गिक युती होती, हे आपले वक्तव्य खरे नाही.
सामंत -
नक्कीच, ही नैसर्गिक युती होती. कारण २०१९मध्ये देखील नैसर्गिक युतीने भाजप व शिवसेना युती मध्ये लढलो होतो. पण ज्या वेळी आम्ही वेगवेगळे लढलो त्यावेळी नक्की तसे का लढलो हे मला देखील माहिती नाही.
कामत -
तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना तुमच्या विधानसभा निवडणुकीच्या बी फॉर्मवर कोण सही करत होते?
सामंत -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा मी अन्य ज्यावेळी निवडणुक लढलो त्यावेळी पार्टीवर विश्वास ठेवून मी ए, बी फॉर्म घ्यायचो.. त्यामुळे सही बघण्याचा कधी प्रश्न आला नाही.
कामत -
पक्षावर विश्वास ठेवून एबी फाॅर्म घेत होतात, असे आपण म्हणालात. याचा अर्थ काय?
सामंत -
ज्या पक्षांमधून मी निवडणुका लढलो होतो त्यावेळी आम्ही कधीच अभ्यास केला नाही की ए.बी. फाॅर्म कोण देते.
कामत -
आपल्या मते राजकीय पक्षातील कोणीही नेता ए आणि बी फॉर्म देऊ शकतो का? किंवा पक्षाचे नेतृत्व देऊ शकत का?
सामंत -
याबाबत मी अभ्यास केलेला नसल्यानेमुळे मला माहिती नाही
कामत -
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे महासचिव सुभाष देसाई व सचिव अनिल देसाई यांनी ते शिवसेना राजकीय पक्षाचे निवडणूक आयोगाने केलेले प्राधिकृत प्रतिनिधी असल्याने तुमच्या ए व बी फॉर्म वर सही केली होती. हे खरे आहे का?
सामंत -
मी सुरुवातीला सांगितले की मी नुसताच फॉर्म घेतला होता, त्यावर कुणाची सही होती हे मला माहिती नाही.
कामत -
शिवसेनेची नेते पदाची रचना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार आहे, ती लोकांसाठी निवडणूक आयोगानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सामंत
शिवसेनेच्या घटनेबाबत माझा पूर्ण अभ्यास नाही. परंतु १९९९ची घटना दुरुस्ती ही वेबसाइट वर आहे. व त्यानुसार शिवसेना पक्ष चालतो, अशी माझी धारणा आहे.
कामत -
तुम्ही सांगितले की बैठकीत तुम्हाला हे कळाले. या बैठक कधी आयोजित करण्यात आल्या होत्या?
सामंत -
याला विशिष्ट असा काही काळ नव्हता. या बैठका, सभा असायच्या.
कामत -
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी बैठक झाली. त्यात बैठकीत त्यांनी पक्ष प्रमुख म्हणून निर्णय घेतले होते, हे चूक की बरोबर?
सामंत
या मताशी मी सहमत नाही. कारण त्यावेळी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आमदारांच्या ठरावाने झाल्या होत्या.
कामत -
उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणजे ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी पक्ष प्रमुख होते? हे खरे आहे का?
सामंत -
होय
कामत -
उद्धव ठाकरे हे जून व जुलै महिन्यात अपात्रता याचिका दाखल करेपर्यंत पक्ष प्रमुख आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, हे खरे आहे का?
सामंत -
मला असे वाटते की या ज्या जून आणि जुलै मधील तारखा आहेत त्याच्या काही कालावधी अगोदर पक्षात काही विशिष्ट गोष्टींबाबत मतभेद झालेले होते, ती देखील पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.
कामत -
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे हे सुरतला गेले होते, त्यानंतर ते गुवाहाटी येथे गेले होते. त्यास आपण पाठिंबा दिला होता का?
सामंत -
पाठिंबा नक्कीच दिला होता, ती तारीख देखील रेकॉर्ड वर आहे.
कामत -
तुम्ही जून २०२१मध्ये कुठल्या दिवशी गुवाहाटीला गेला होता?
सामंत -
मला निश्चित आठवत नाही. पण २४ किंवा २५ जूनला गेलो असेल.
कामत -
विधीमंडळ पक्षाचे कार्य कसे चालावे,याबाबत पक्षाच्या घटनेत कुठलाही उल्लेख नाही, तसे आपण का म्हणत आहात?
सामंत -
मी मघाशी उल्लेख केला की १९९९मध्ये घटना दुरुस्ती झाली, त्याचा मला पूर्ण अभ्यास नाही. पण त्यात जे काही थोडे मी वाचले, त्यातून मी असे म्हटले आहे.
कामत -
तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्याप्रमाणे तुम्ही निवडणूकीनंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या महाविकास आघाडीमुळे नाराज होता, हे खरे की खोटे?
सामंत -
होय, मी नाराज होतो
कामत -
तुम्ही २०१९ ते जुन २०२२पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद भुषविण्याइतपत नाराज होता का?
सामंत -
ज्यावेळी मी मंत्री पदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो. भविष्यात तशीच कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधी नंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. म्हणून मी मंत्री मंडळात सामील झालो
कामत -
उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करावी म्हणून भेटला आहात असे नमूद केले. तुम्ही एकनाथ शिंदे यांना तशी विनंती का केली नाही?
सामंत -
मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे देखील अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भेट घेऊन हे सांगितले होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
कामत -
तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केली, कारण उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्ष। प्रमुख होते. ते शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होते. हे चूक की बरोबर?
सामंत -
बरोबर.
कामत -
जेव्हा तुम्ही "पक्ष संघटनेतील बहुतांश" असा उल्लेख करता, त्यावेळी तुम्ही पक्ष संघटनेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी असे म्हणायचे आहे का?
सामंत -
निवडणूक आलेले प्रतिनिधी म्हणजे त्यामध्ये आमदार, खासदार असतील, विधानपरिषदेचे सदस्य आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील.
कामत -
तुम्ही वर्षा बंगला येथे २१ जून २०२२ रोजी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित होतात, कारण आपल्याला सुनील प्रभू यांनी २१ जून २०२२ रोजी काढलेला व्हीप जारी केला होता. हे खरे आहे का?
सामंत -
२१ जून रोजी माझे विधीमंडळ सहकारी गुलाबराव पाटील यांनी फोन करून मला वर्ष बंगला येथे बैठक असल्याचे सांगितले. पण ही बैठक कशा संदर्भात आहे हे सांगितले नाही. मी या बैठकीत उपस्थित होतो. त्यादिवशी किंवा त्यानंतर कोणत्याही व्हीप मला देण्यात आला नाही. मी ते स्वीकारला नाही आणि कोणतीही सही कोणत्याही कागदावर केलेली नाही