केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. या घटनेने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना व भाजपकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणावर लोकशाही न्यूजला प्रतिक्रिया दिली.
नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देणार होते याला शिवसेनेचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र असा कुठेही वाद नव्हता, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हणत आरोप फेटाळला. तसेच नारायण राणे जे एकेकाळी कट्टर शिवसैनिक होते, त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झाले पाहून बरे वाटले. मात्र जन आशीर्वाद यात्रेत उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला गेला आणि टीका करण्यात आली. त्यामुळे ज्या मुख्यमंत्र्याची ख्याती देशात अव्वल नंबरवर आली आहे. त्याचा अपमान होत असेल तर स्मृतीस्थळावर दररोज फुले वाहणार दुग्धाभिषेकच करेल. नतमस्तक होणार ते डोकं शिवसैनिकांना मान्य नसेल, हि प्रत्येक शिवसैनिकाची वैयक्तिक भूमिका असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचे विधान नारायण राणे यांनी करत शिवसेनेला एकप्रकारे आव्हान दिले आहे. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आव्हाने शिवसेना नेहमीच स्वीकारते.शिवसेना सोपा पेपर सोडवत नाही, कठीण पेपरच सोडवते. शिवसैनिक आव्हानाला खचून जाणार नाही, आव्हानाला आम्ही सामोरे जातोय असे त्यांनी प्रत्युत्तर दिले.