sharad pawar team lokshahi
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : अपक्षांना आपल्या बाजुने करण्यात भाजप यशस्वी, निकालाने धक्का बसला नाही: शरद पवार

Sharad Pawar : प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता

Published by : Shweta Chavan-Zagade

अमोल धर्माधिकारी | पुणे : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात ठेवून भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला विजय मिळवण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचीच रणनीती कामाला आली. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुणे येथे शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना म्हटले की, राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. या निकालाने धक्काही बसला नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव; भाजपचे राजेश वानखडे यांचा विजय

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी