राज्यातील सत्तासंघर्षात आज नवीन वळण मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या नक्षलवाद्यांकडून खून करण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांनी सुरक्षा पुरवण्यात वर्षा बंगल्यावरुन (उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नाही) नकार दिला, असा खळबळजनक आरोप नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांच्या या आरोपांना दीपक केसकर यांनीही दुजोरा दिला. यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळी घसरल्याचे दिसून येत आहे.
आमदार सुहास कांदे यांनी माध्यमांशी बोलतांना खळबळजनक आरोप केले. ते म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाच्या विचार घेऊन आम्ही उठाव केला आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्या काळात काही नक्षली मारले गेले. त्यानंतर नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांचा खून करण्याचा प्रयत्न होता. ही बातमी सुरक्षा यंत्रणा समजल्यावर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी झाली. मात्र, वर्षा बंगल्यावरुन (थेट उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता) त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नये, असे आदेश आले. म्हणजे शिंदे त्यांचा खून करण्याचा हा प्रयत्न होता, असा थेट आरोप सुहास कांदे यांनी केला.
दीपक केसकरांनी दिला दुजोरा
एकनाथ शिंदे यांना सुरक्षा नको हे आमच्या नेत्यांनी त्यावेळी सांगितलं होत हा मुद्दा खरा आहे...एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा मुद्दा कॅबिनेटमध्ये देखील आला होतं. त्या कॅबिनेटला मी देखील होतो...माझ्यासोबत असलेले सर्व आमदार शिवसेनेसाठी झटलेले आहेत. त्याच्या रक्तात शिवसेना नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आदित्य ठाकरे यांच्या टिकेनंतर दीपक केसरकर यांची शिंदे गटातील जेष्ठ आमदारांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेत हा खुलाशा केला.
काय होता कांदेंचा आरोप
शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी काही नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असा आदेश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना सकाळी 8.30 वाजता वर्षावरुन आला. वयाच्या 16 व्या वर्षापासून शिंदे हे सेनेत आहेत. त्यांनी शिवसेना मोठी केली. शिवसेना मोठी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तुम्ही मदत करणार होता का? याचा अर्थ तुम्ही हिंदुविरोधी कृती केली, असा थेट आरोप सुहास कांदे यांनी केला.
दाऊदच्या माणसांना सोबत
दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. त्यामुळे शेकडो जणांचे जीव गेले. बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचे काय, असा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला.