अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून अकोला येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर वाशिम जिल्ह्यात पोलिसांनी धाड सत्र सुरू केले आहे. आज वाशिमच्या कारंजा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने दोन गुटखा व्यवसायीकांच्या दुकानात छापे टाकून 1 लाख 48 हजार रूपयाचा गुटखा जप्त केल्याची कार्यवाही केली.
तर दुसऱ्या जुगारांच्या कार्यवाहीत अमरावती परीक्षेत्राचे विशेष पेालीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात शहरातील चार ठिकाणी जुगार अडयावर धाडी टाकून कार्यवाही केली. ग्रामीण भागातील कोळी फाटा, जयस्तंभ चैक मधील दोन ठिकाणी तसेच बायपास परीसरातील एका हाॅटेलवर सुरू असलेल्या जुगार अडयावर धाडी टाकून यांच्या कडून अंदाजे 25 मोटार सायकलसह 40,50 व्यक्तीना जुगार खेळताना रंगेहात पकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
ठाणेदार यांच्या आशीर्वादाने कारंजा शहरात अवैध धंदे राजरोसपणे चालू असून यावर कोणतीच कारवाई न करता दोषी आढळलेल्या ठाणेदार सतीश पाटिल यांची तडकाफडकी उचलबांगडी करून वाशिम पोलीस नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यां मध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.