Sambhajiraje Chhatrapati  team lokshahi
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभा निवडणूक लढवणार की नाही?

संभाजीराजेंची आज सकाळी ११ वाजता मुंबईत पत्रकार परिषद

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले होते. यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्याचे आवाहन केले होते. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की नाही, यासाठी आज (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद (Press conference) घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadiche) चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संभाजीराजे माघार घेण्याची शक्यता अधिक

संभाजीराजे छत्रपती आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करून घेण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही. अर्ज भरताना ही परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीतही संभाजीराजे यांना कितपत पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकताच आहे. त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी