महाराष्ट्र

Red Alert in Pune : कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम, 144 कलम लागू अन्...; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून त्याच अनुषंगाने आता पुणे पालिका प्रशासन सज्ज झालेलं झाले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात पावसानं (Heavy Rainfall ) चांगलेच धुमशान घातलं आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला असून कोकणासह विदर्भाला अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, पुण्यालाही रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तीन दिवस पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. तसेच, पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वच खाजगी कंपनी आणि आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं आहे.

रेड अलर्टच्या पार्शवभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ल्यांसह सर्व पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत. सिंहगड, लोहगड, विसापूर, राजगड, तोरणा किल्ले यासह इतर गडांवर १४४ कलम लागू होणार आहे. यांसह इतर पर्यटन स्थळं अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, पानशेत धरण परिसरात १४४ लागू. करण्यात येणार आहे. तसेच, पर्यटकांनी संबंधित ठिकाणी न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हे करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितला आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या कल्पना सॅटेलाइटनं पाठवलेले संध्याकाळी सहा वाजताचे फोटो बघता संबंध महाराष्ट्रावर ढगांची प्रचंड दाटी दिसून येत आहे. यामुळे कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात व विदर्भातही अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीसारखा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी